ओढ पावसाची ( सहाक्षरी )
ओढ पावसाची ( सहाक्षरी )
( सहाक्षरी )
ओढ पावसाची
लागतेय अशी
रुसलेली सखी
पाहतेय जशी ॥ १ ॥
पावसाच्या धारा
त्या पागोळ्यातून
प्रीतीचे धुमारे
रोमारोमातून ॥ २ ॥
चोरीचा हवा
मस्तीत गारवा
डोली उगाचच
मनी तो पारवा ॥ ३ ॥
पावसाची झड
दाटलेलं नभ
मिठीत येवून
चावलेली जीभ ॥ ४ ॥

