नयनाआडची दृष्टी
नयनाआडची दृष्टी
अशी आहेस अबोल
पण इशाऱ्याच्या खेळात झकास आहेस तू
पदर सावरणारी लाजरी बुजरी
मनाने मात्र दिलखुलास आहेस तू
मला पाहताच लाजणारी तुजी नजर
देते माझ्या प्रेमाची साक्ष
काळजात चर्रर्र होत माझ्या
जेव्हा नजर भिडवून देतेस कटाक्ष
गालावरची खळी जणू पौर्णिमेची चांदणी
सैल बांधा नाजूक जिवणी
नाजूक हास्य सांगते मजला तुझिया मनाच्या गुजगोष्टी
प्रेमाची माझ्या कबुली देते तुजी नयनाआडची दृष्टी.

