नवरा बायको...
नवरा बायको...
नाही ओळखता येत ,
बायकोला नवऱ्याच्या मनातले,
अन् नवऱ्याला बायकोच्या मनातले,
पण तरीही नकळत ओळखल्या जाते,
नक्की पाणी कुठे मुरले ...
सवय होते ऐकमेंकाची ,
विचारांचे मार्ग कळले ,
सोबतीने चालता चालता ,
मनाचेही ठाव लागले...
आज रूसलयं बघा कुणीतरी,
असे म्हणून बोलले ,
मिठीत शिरता रुसवा फुगवा,
कुठला कोणता कुणाला आठवले...
साथ जन्मभराची ही ,
वटालाही विनवू लागले ,
साताजन्माचा सोबती हा,
म्हणूनच तर मग ,
नवऱ्याला परमेश्वर केले...

