Ajay Nannar

Inspirational Others


3  

Ajay Nannar

Inspirational Others


नवे वर्ष 2021

नवे वर्ष 2021

1 min 247 1 min 247

      नव्या या वर्षी....

      संस्कृती आपली जपुया....

      थोरांच्या चरणी एकदा तरी....

      मस्तक आपले झुकवू या....


      नव्या या वर्षी ....

      आकाशी उधळले रंग नवे....

      प्रत्येक क्षण साठव मनात नव्याने....

      होऊदे त्यांचे थवे....


   स्वागत करण्या नववर्षाचे....

   कॉलेजचा प्रत्येक कट्टा असेल सजलेला....

   प्रत्येक चेहेरा असेल आनंदाने खुललेला....

   शत्रूही असेल आज मित्रासारखा....

   गतवर्षीचे सारे काही भूललेला....


      पाकळी पाकळी भिजावी 

      अलवार त्या दवाने....

      फूलांचेही व्हावे गाणे

      असे जावो वर्ष नवे....


      दुःख सारी विसरुन जाऊ....

      सुख देवाच्या चरणी वाहू....

      स्वप्ने उरलेली...नव्या या वर्षी

      नव्या नजरेने नव्याने पाहु....

   

      प्रयत्नांचे नवे पंख लावून....

      स्वप्नांच्या नव्या आकाशी सैर कर....

      

  साथीला घे धैर्याला,

  अन, आकांक्षांची नवीच शिखरे तू सर कर....

   

  नव्या या वर्षात

  संकल्प करुया साधा सरळ आणि सोप्पा....

  दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया

  ह्रदयाचा एक कप्पा....


  एक - एक दिवस मंतरलेला

  नव्या वाऱ्याने भारलेला....

  

   जगून घ्यावे सारे - सारे 

   आकांक्षांचे नवे वारे....


   गतवर्षीच्या....

   फुलाच्या पाकळ्या वेचुन घे....

   भिजलेली आसवे झेलून घे....

   सुख दुःख झोळीत साठवून घे....

   आता उधळ सारे हे आकाशी

   नववर्षाचा आनंद भरभरुन घे....


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Nannar

Similar marathi poem from Inspirational