STORYMIRROR

CHANCHAL MULE

Inspirational

3  

CHANCHAL MULE

Inspirational

नऊ रंग नऊ रूप स्त्रीची

नऊ रंग नऊ रूप स्त्रीची

1 min
154

पहिला रंग शिवरायांच्या डोळ्यात स्वराज्य रक्षणाचे जाज्वल्य तैवत ठेवले अशा तेजस्वी मातेचा जिजाऊचा.

दुसरा रंग इंग्रज विरुद्ध लढा देणाऱ्या, सर्व स्त्रियांच्या मनात ऊर्जा निर्माण करणाऱ्या मर्दानी राणी लक्ष्मीबाईचा.

तिसरा रंग विधवा स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळवून देणाऱ्या करुणेची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्या बाईचा.

चौथा रंग इस्लामी राजवटी मध्ये जन्म घेतलेल्या युद्ध कौशल्यात पारंगत असलेल्या रजिया सुलतान साहसी, धाडसी, शुर स्त्रीचा.

पाचवा रंग सनातनी वर्गात राहून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या सावित्री बाईचा.

सहावा रंग डॉ बाबासाहेब यांच्या यशात मोलाचं योगदान देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमुर्ती भिमा बाईचा.

सातवा रंग आजारी, लाचार, गरजवंताची मदत करणाऱ्या, आयुष्भर दुसऱ्यांची निस्वार्थ भावाने सेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांचा

आठवा रंग अनाथ मुलांना सांभाळून, त्यांना जीवनाची दिशा देणाऱ्या प्रत्येक नकोशा जीवाला आपल्या मायेच्या पदराखाली घेणाऱ्या वात्सल्याची मूर्ती सिंधुताई सपकाळ म्हणजेच माईचा.

नववा रंग वर्दित राहून स्वतः चे कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या स्त्रीचा. देशाचे रक्षण करताना स्वतः चे प्राण गमावलेल्या शहीद पत्नीचा. आजी, बहीण, आई, बाई म्हणून घेणाऱ्या तुमच्या माझ्यातल्या सामान्य स्त्रीचा.

स्त्री आहे म्हणून मला पावलो पावली पुरुषांनो तुम्ही हिनवू नका. पोटात घालते ती तुमच्या कित्येक चुका.

जन्मापासूनच सुरू होतो तिचा खडतर प्रवास

सोडत नाही तरी ती तिचा नव्याने उमलण्याचा अट्टाहास

दुःख, अपमान, इच्छा, मासिक पाळी, विधवापण, बलात्कार झाल्यावरही ती स्वतः सावरते

कोण म्हणते रे स्त्री फार हळवी असते

स्त्रीशक्ती कधीच सामान्य नसते, नऊ रूप, नऊ रंग तिची ओळख दर्शविते. धन्यवाद स्टोरी मिरर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational