नशीब
नशीब
नशीबाचा खेळ
सारे अलबेल,
हस्त रेखा जणू
पणास लावेल !
अतिविश्वास हा
नशीबाचा पाया,
जीवनाचे मोल
घालवते वाया !
उठ रे मानवा
हो आता शहाणा,
नशीब म्हणतो
सोड तू बहाणा !
आपल्याच हाती
नशीबाची दोरी,
घामाची कमाई
दौलत ही न्यारी !
हिमतीने सदा
नशीब कमव,
पै पै हा जोडून
सुख तू जमव !
दुकान थाटून
काढला हा धंदा
त्याचाच आहे रे
नशीबाचा वांदा !