STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Inspirational

3  

Gaurav Daware

Abstract Drama Inspirational

नशिबाचा खेळ

नशिबाचा खेळ

1 min
282

नशिबाचा खेळ नशिबापुढे झुकतो

पुन्हा येणाऱ्या अंधारात आयुष्य उघडतो.....


थोडया अबोल रात्रींना पुन्हा पुन्हा मिळतो

बोलक्या असणाऱ्या प्रकाशात अबोल होऊन बसतो.....


मानणाऱ्या गोष्टीला तो सर्वस्वी मानतो

भूल देणाऱ्या गोष्टींपुढे पुन्हा मात्र झुकतो......


श्रीमंतांची साथ देत गरिबांशी लढतो

संकटात तो कधी आणखी संकटात पाडतो......


आयुष्याच्या उंबरठ्यावर कधी वळून बघतो

न संपणाऱ्या प्रश्नांना उत्तर देऊन नाचतो......


थोडया बोलक्या स्वप्नाना तो कधीतरी मिळतो

पैशापुढे कधी कधी कुणाच आयुष्य उजाडतो......


म्हणून नशिबाचा खेळ नशिबापुढे झुकतो

पुन्हा येणाऱ्या अंधारात आयुष्य उघडतो.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract