नशेच्या दुनियेत
नशेच्या दुनियेत
नशेच्या दुनियेत
नशाखोरं दंग
नशेच्या स्वाधीन होते अंग
आणि आरोग्याचा उतरतो रंग
कुठं पण बसतं
आरबट-चरबट,नाहक भांडत
वाईट संगतीतून इज्जतीचा
जगासमोर बाजार मांडत
घायाळ वायाळ झिजते
तन त्याचे सारं
सोनेरी जीवनाला झोंबतं मग
बदनामीचे वारं
दुनिया ती नशेची
तिथं नशा, कायमचं दंग
जीव, इज्जतीला जप जरा
सांभाळून रहा अंग
