नरसिंह नारायण
नरसिंह नारायण
चौथे विष्णू अवतार
धरे नरसिंह रूप,
करण्यास नायनाट
दृष्ट राक्षसी स्वरूप..!!१!!
दैत्य हिरण्यकश्यपू
सूड घेण्यास संतापे,
देई त्रास सर्वांनाच
देव भयभीत कंपे..!!२!!
अमरत्व समजून
करे अधिपती प्राप्त,
देव धावे विष्णुपरी
छळ करण्या समाप्त..!!३!!
विष्णू देई आश्वासन
नक्की होईल विनाश,
जर प्रल्हाद त्रासेल
नियतीच करी नाश..!!४!!
कोपे हिरण्यकश्यपू
विष्णू स्मरता प्रल्हाद,
लाथ घालता खांबात
नारायण ऐके साद..!!५!!
रुप अक्राळ विक्राळ
नरसिंह अवतारे,
धरे हिरण्यकश्यपू
करे दैत्य विनाश रे..!!६!!