STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

नक्षत्राचा शालू

नक्षत्राचा शालू

1 min
372

नक्षत्रांचा शालू


लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला

सजनाने दिली एक छानशी पैठणी

सजली सजणी अलंकारांनी 

जणू भास ती शुक्राची चांदणी.....


पैठणीवरील नक्षीकाम जाळीदार

मोर नाचरा थुई थुई पदरावर

नक्षत्रांचा भरजरी शालू सजणीला

भेट पहिली ही फारच भरदार...


पैठणीचा सुवास दरवळला चौफेर

ओळखीचा हीना अत्तराचा 

सुगंध ह्रदयाच्या कुपीत साठलेला

वाढदिवस पहीलाच दोघांच्या लग्नाचा....


नक्षत्रांचा शालू हा भरजरी 

आठवणीत राहिल जीवनभरी

पाहीन जेव्हा हा पैठणी शालू 

उलगडतील जीवनातील सुखाच्या सरी....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance