STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

4  

Manisha Awekar

Romance

नजरभेट

नजरभेट

1 min
227

क्षण आनंदाचा / नजरभेटीचा

मनोमीलनाचा/ प्रेमिकांना


शब्दावाचूनीया / शब्दांपार जाई

सांगूनीया जाई / सारे काही


भाषा नयनांची / मुग्ध प्रेमवाणी

जाण मनोमनी / नकळत


जादू नयनांची / प्रेमाचे मध्यस्थ

करिती आश्वस्त / भावभरे


चोरट्या प्रेमात / चक्षू साक्षीदार 

ओढ वारंवार / दृष्टीभेटी


फितूर नयन / मनी हितगूज

ओठांलागी गूज / अडतसे


प्रियकर धीट / तिला खुणावतो

प्रिये बोलावतो / भेटीलागी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance