नियती
नियती


आयुष्याचा सारीपाट
खेळताना वाटतं
सर्वच प्यादी आपली आहे...
आपल्याला हवं तसं
खेळण्याची मुभा आहे
आपल्याला हवा तसा
डाव आपण खेळू शकतो
सुख ओरबाडून सारे
दुःख बाजूला सारू शकतो...
पण नियतीचं एक प्यादं
असंही असतं...
त्याच्या पुढे मनुष्याचं
काही चालत नसतं
क्षणात सारा उधळून डाव
आणतो मनुष्याला रस्त्यावर
करोडपती बनतो भिकारी
सारे त्याच्या मर्जीवर
हतबल तू मनुष्या
प्रयत्न केले किती?
आयुष्याचे प्यादे सारे
नियतीच्या रे हाती