STORYMIRROR

Sarika Jinturkar

Classics Others

4  

Sarika Jinturkar

Classics Others

नियती

नियती

1 min
389

नियतीच्या मनात वेळोवेळी नवीन असते काही 

कधी दुःखाची झळ तर कधी सुखाची चाहूल आयुष्यात आपल्या येत जात राही


 जीवनात चढ-उतार असतात विधिलिखित 

बोध घेण्यासाठी केले असावे का निर्मित..?  


चांगले कधी वाईट हे समीकरण असत सुरू करून कुठे थांबायच हे शिकायलाही मिळत


 कधी हसता हसता आसमंत गहिवरून येतो हिरवीगार पालवी, तरी त्याचा पालापाचोळा होतो


पाहता पाहता डोळ्यात अंधारून येते फुलले सारे माळरान 

ओसंडून जाते 

 नियती अशी काही खेळ मांडते 

भरली ओंजळ, क्षणात सारे सांडते 

बहरता बहरता ऋतू संपून जातो 

देह जाळीत हा वनवा वैशाख होतो आयुष्याच्या शेवटी जीवनाचे रहस्य उलगडते

 पानगळी नंतर नवी पालवी, सृष्टीला देखील बहर येते..  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics