STORYMIRROR

Nalanda Satish

Tragedy

4  

Nalanda Satish

Tragedy

निवडणुकीचं वारं ...सैराट झालं

निवडणुकीचं वारं ...सैराट झालं

1 min
466


निवडणुकीचे पडघम वाजले

ढोलताशे पदयात्रेने शहर गाजले

शिक्कामोर्तब झाले देशभक्तीचे

लोकशाहीच्या जत्रेला उधाण आले


स्वयंवर ठरले लोकशाहीचे

स्वयंभू सज्ज झालेत नेते

कोणाच्या गळ्यात पडेल वरमाला

पैश्याच्या जोरावर विकत घेतात मते


देठापासून बेंबीच्या ओरडत

धुरा देशाची आमच्याच खांद्यावर

मंचावर गळचेपी रात्री गळाभेट

कोंबड्या बकऱ्या निजल्या मद्यावर


घोटाळ्यांना लागले डोहाळे विकासाचे

निवडणुकीच्या वाऱ्याने सैराट झाले सारे

दलबदलू नेते लोकशाहीचा कर्दनकाळ

यथाशक्ती घेतात तुमचाचं समाचार बरे


लोकशाहीला साजेसं व्यक्तिमत्त्व निवडा

संविधानाने चालणाऱ्यालाचं मतदान करा

जनहितार्थ नाही केले कार्य तर

परतीच्या अधिकाराचा पूर्ण वापर करा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy