STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

निवडणुकीच वार

निवडणुकीच वार

1 min
370

निवडणुकीचं वारं*


निवडणुकीचं वारं फिरलय

आश्वासनाचे महापूर आले

काका काकू मामा मावशी

आजी आजोबा नाते मिळाले.....


ओळख नाही पारख नाही

नवनवे मॅसेजेसचा पुर

कथा पुजा मंदिरात रोज

मोबाईल सोडतो हा धूर.....


प्रजेचे स्वप्नं पुर्ण करण्या

पाच वर्षे ही कमी पडती

धडपड बघा खुर्चीकरीता

हात कसे लाचारीने जोडती.....


मोठमोठ्या नटनटीची चमक

भाषणात चौफेर नजरबंदी

चंदेरी नगराचा आटपाट राजा

जनतेच्या डोळ्यात भरतो धूंदी.....


प्रचार करण्याकरीता दनक्यात

चमच्यांची ही ओटी भरती

निवडणुकीचं वारं भरतय अंगी

अांधार भरायला बाटल्या येती....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational