निवड
निवड
केली आयुष्यात निवड तुझी नाही चुकलो मी
सावली सारखी उभी म्हणून नाही खचलो मी
संसार केला सुखाने सोबतीने आजपर्यंत तुझ्या
कठीण त्या प्रसंगात मागे कधीच नाही हटलो मी
साथ तुझी माझी जशी सोबत चंद्राला चांदण्यांची
किनारा बनून सागराचा शेवटी तळ तो गाठलो मी
सद्गुणांची खान तू निर्मळ वाहणारी शांत सरिता
तुझ्याच सोबतीने माणूस म्हणून आज घडलो मी
कुशाग्र बुद्धी ,निर्णयक्षमता ,वर्णावे गुण किती हे
सुंदर साथ होती म्हणून कधी नाही बिघडलो मी
एकच इच्छा शेवटी सरणावर जाऊ एकदा जोडीने
कधी नाही आज सोबतीने तुझ्या शेवटचा रडलो मी
