STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

निवारा

निवारा

1 min
269

भटकत भटकत आली इथवर

दबकत दबकत बसली पायरीवर

वारा पाऊस चिंब भिजलेली

अलगद हातावर येवून बसली

सापडत न्हवती विसाव्याची जागा

आली पळत मिळाला धागा

लपेटले गुंडाळले छोट्या कपड्यात

निरागस डोळे चमकले विश्वासात

आसरा होता थोड्याच दिवसांचा

निवारा मिळाला अनोळखी चेहऱ्यांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract