निसर्गाची शाळा
निसर्गाची शाळा
निसर्गाची शाळा
किती शिस्तप्रिय आहे
शाळा छान निसर्गाची,
मोठा किमयागार तो
चित्र रेखाटे सृष्टीची
वर्षाराणीच्या आगमनाने
बदलती हे ऋतुरंग,
चिंब होती सृष्टी सारी
आनंदाने होती दंग
येती श्रावण महिना
सृष्टी बहरली सारी,
शालू नेसून हिरवा
जणू नटली नवरी
बिया रुजल्या मातीत
फुले अंकुर कोवळा,
कसे घडे सृजन हे
दिसे सुंदर सोहळा
वर्षाऋतू घेऊन येतो
सणांची मेजवानी,
नटून थटून सख्या
गाती आनंदाची गाणी
उपास, तापास, व्रतवैकल्य
पंचपक्वनांची मजा,
म्हणूनच म्हणती ह्याला
उत्सवाचा हो राजा
