STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Fantasy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Fantasy Inspirational

निसर्ग...

निसर्ग...

1 min
268

हिरव्या रानी नभ ओथंबले 

बहरली सृष्टी नवंकुराने

नवकांती ल्याली असे धरा

निसर्ग हसतो स्वानंदाने 🌿


आले उतरुनी नभ अंगणी 

चाहुल नव चैतन्यमयी 

किलबिलाट पशुपक्षंची 

मन ,प्रफुल्लित रानोमाळी 🌿


ओझरती झरे प्रितीने

भारावते सृष्टी पावसाने

सरिता प्रितिसागरच्या ओढीने 

वाहती वारे आनंदाने 🌿


आगमन श्रावणसरी चे 

सजते धरा नववधू जशी 

आगमन भाद्रपदा गौरीचे 

मंगलदायी अवघी सृष्टी ही 🌿


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance