STORYMIRROR

काव्य चकोर

Fantasy

3  

काव्य चकोर

Fantasy

निसर्ग ज्ञानझरा...

निसर्ग ज्ञानझरा...

1 min
567

जेथे जातो जेथे गुरु मज दिसतो..

निसर्ग असते शाळा अन् मी विद्यार्थी होतो..!!


हंबरते गाय वत्सले वासरु घेते आवगे धाव..

वात्सल्याचा तेथेच लागतो मजला ठाव..!!


शीळ सुरेल वाऱ्याची पाखरांचं मुक्त गाणं..

ऐकून मिळे नकळत सुरेल संगीताचे ज्ञान..!!


लपेटुन घेता तरुंना विश्वासे घट्ट वेली..

आधाराची शिकवण त्यात दिसते लपलेली..!!


फुला फुलांवर मौजे बगडती फुलपाखरे..

आनंद उगम स्तोत्र तेथेच दिसते खरे..!!


दौडते आवेगे नदी समावण्यास सागरी..

प्रेम ओढ आंतरिक पाझरते तिथे अंतरी..!!


न आटणार कधीच हा अमोघ ज्ञान झरा

मिळतो मनास त्याने नित्य नवा उभारा..!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy