निशाणा
निशाणा
निशाणा
आयुष्य जगायचे असेल तर
मागे वळून पाहू नको
ध्येय ठरवा आपल्या मनात
निशाणा तुझा चुकवू नको।।
गावात शहरात नव्हे सर्वत्रच
जगात पाहिले अनेक अनोळखी
लोकांचे हे जग आहे तरी
एक ही माणूस नाही ओळखी।।
चेहऱ्यावर एक वेळ हसू आले
तेव्हा ती रडण्याची वेळ होती
भीती वाटत होती माझी मला
पण ती नियतीची खेळी होती।।
माझ्या जीवनात अजून काय घडलं
नाही विचारलं तर खूपच छान
आजकाल माणसात एकच इर्षा
नाही पाहिजे कुणी ही सान।।
जे सर्व बाबी जातात विसरून
त्यांना काहिच नाही त्रास
दोन तीन पेग पोटात टाकून
झोप काढतात ते खास
