STORYMIRROR

Suhas Bokare

Tragedy

3  

Suhas Bokare

Tragedy

निरोप

निरोप

1 min
177

तुझ्या स्वप्नास साजेसेच आकारेन मी 

दुरावा खास काळोखात हाताळेन मी


तुझ्या पायात येता जोडवे चांदीतले 

तयाचे लाजरे आवाज सांभाळेन मी


तुझ्या डोळ्यात काही ओळखीची आसवे

तयांना श्वास ओवाळून जोपासेन मी


'नको येऊस माझ्या दूर देशी तू कधी'

तुझे होताच हे बोलून भारावेन मी


सकाळी चंद्र नाहीसाच झालेला बरा

पहाटे खूप आधी आज अंधारेन मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy