STORYMIRROR

Rama Khatavkar

Classics Others

4  

Rama Khatavkar

Classics Others

निळ्या सावळ्याची छाया

निळ्या सावळ्याची छाया

1 min
204

(अष्टाक्षरी)


निळा रंग आकाशाचा

जळी होई प्रतिबिंब 

एकरूप होता होता

नभ होई चिंब चिंब


शुभ्र धवल हिमाने

झाक निळ्याची घेतली,

निळ्या गहिऱ्या डोहात

लाट लाट उमटली


खाली निळा हा मयूर 

वर पारव्याची जोडी

भूमी आकाशाला गोडी

दोघांचीही थोडी थोडी


निळा रंग हा शांतीचा

शुद्ध विशाल मनाचा

काठावर बसलेल्या

मूक अतूट मैत्रीचा


निळ्या सावळ्याची छाया

इथे तिथे पसरली

रंगबावरी राधिका

देहभान विसरली


आभाळाच्या भाळावर

चित्र निसर्ग रेखतो

ज्याची रसिक नजर,

त्याला पुन्हा बोलावतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics