STORYMIRROR

Poonam Arankale

Inspirational

3  

Poonam Arankale

Inspirational

निळाई

निळाई

1 min
354

वरती आभाळ भरून लखलखणारी, 

लख्खं निळाई... तेजोमयी, हसरी


याच हसऱ्या आभाळमायेच्या ओढीने, 

झेपावती हिरवाई, ऊंच ऊंच सरसरणारी


त्याच हिरवाईचा मी ही एक भाग, 

त्या निळ्याशार आभाळमायेची ओढ असणारी 


लेक मी या समृद्ध प्रेमळ हिरवाईची, 

विरघळवत मन आभाळमायेत विरणारी 


सामावून तेथ, कृतज्ञ हिरवाईशी, 

निळाईशी जोडलेलं प्रेमळ अक्षय नातं जपणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational