रतीमदन रूप
रतीमदन रूप
1 min
393
देत रहावे, रिते होऊन
प्रेमाचे ते रूप गहिरे ||
घेत रहावे, देताहे तोवर
प्रेमाचे ते रूप अधीरे ||
कुणा गहिरे, कुणा अधीरे
प्रेमरूप गुढरंगीन रे ||
गुढगहिऱ्या त्या रूपावर
मोहित मनोसृष्टी रे ||
युगानुयुगे साकारत राहे
नूतन रतीमदन रूप रे ||