नाजुकशा त्या गिरकीमधूनी
नाजुकशा त्या गिरकीमधूनी
1 min
223
रंगरंगीले रेशमी मुलायम,
फुलपाखरू भिरभिरते गे,
नाजुकशा त्या गिरकीमधूनी,
गंधमोहनी बाल्य जागवते गे ||
गुलाबपुष्पी ताटव्यातले,
मधुमालतीसम दरवळते,
नाजुकशा त्या गिरकीमधूनी,
गंधमोगरी बाल्य जागवते गे||
कर्दळी मखमालीवर फिरत,
डेलियासंगे डोलविते ते,
नाजुकशा त्या गिरकीमधूनी,
गंधशेवंती बाल्य जागवते गे||
घाणेरी, रिंगणीवर फिरुनी,
करवंदी मध चाखवते ते,
नाजुकशा त्या गिरकीमधूनी,
गंधबकुळी बाल्य जागवते गे ||
अळवावरच्या दवबिंदूसम
चमचमते बाल्य खेळवते ते
नाजुकशा त्या गिरकीमधूनी
स्मृतिगंधीत बाल्य जागवते गे||