लीन
लीन
1 min
441
दूर मंदिरात,
होई घंटानाद
विश्वेश आतून,
आकर्षितो प्राण ||
सांजवता दिन,
श्रांतलेले मन
घेतसे विश्राम,
अंतरी गहन ||
साद अमूर्ताची,
धून कैवल्याची
जागविते आत,
मूर्त ते चेतन ||
तरल चेतन,
प्रकाशित मन
प्रसारणातून,
विश्वम्भरी लीन ||