STORYMIRROR

Poonam Arankale

Others

4  

Poonam Arankale

Others

मिरची

मिरची

1 min
470

सुखद, तकतकीत हिरवी कांती 

सुंदर सडपातळ बांधा शेलाटी |

ऊभी लवलवती ज्वाला हिरवाईची  

अंगार तिखटाचा धरुनी पोटी |

नका हो करू फार अवतीभवती 

आणि नकोच बरं उगा दमदाटी 

ओह्ह, काढलीत नं चुकून हिची खोडी 

बसलाच झणझण चटका जीभेवरती !!

राहील नं लक्षात नांव, लवंगी मिरची

घटघट प्या बरं आता, पाणी वरती !! 


Rate this content
Log in