STORYMIRROR

Poonam Arankale

Others

4  

Poonam Arankale

Others

ठोसा

ठोसा

1 min
113

एक एक चौकट ओढून घेतलेली

प्रारब्धवश होत, मोहवश होत 'स्व' ची

महाकारणदेहातून मग कारणदेहाची,

मनोदेहाची, पंचमहाभूतीय लिंगदेहाची ....

देहधारणेचाच अवकाश की लागलीच भर त्यात

घरच्या संस्कारीय चौकटींची कर्तव्य, जबाबदा-यांची, नात्यागोत्यांची, स्त्रीत्वाची, पुरुषत्वाची, 

आशाकांक्षी प्रेमाची, पुर्ननिर्मितीची

भेदाची, देश-कालाची, धार्मिकतेची, रुढी परंपरांची

सत्ता आणि संपत्ती मानकांची 

एक एक वाढती चौकट अशी, 'स्व' ची

प्रत्येक चौकट वेगळ्या घुसमटीची 

संकोचवत नेणारी, दडपवणा-या ताकदीची


आणि मग ... 

मग पडते एक तगमगती ठिणगी 

ओढवून घेतलेल्या मोहमयी,

ताकदवर चौकटीतून सुटण्याच्या धडपडीची,

एका जबर मनस्वी बंडाची, स्फोटाची...

त्या स्फोटांतून होते सुरवात, मोहाला दूर सारत, 

सुटकेसाठी स्व ताकद अजमावण्याची

मोहवशात लादून घेतलेल्या प्रत्येक चौकटीला

 हलवून धक्का देण्याची

त्यासाठी लागणारी ऊर्जा कमावण्याची

एक एक ताकदीचा ठोसा देत चौकट तोडण्याची

चौकटीमुक्त होत ऊर्जस्वल जगण्याची

गगनमार्गी होत मन:पुत भरारण्याची

त्या भरारीसाठीच तर असते  

साधनारूप ताकद कमवायची


बस....

एकच ताकदवर, जानदार ठोसा 

अन् ढासळ चौकटींची 

अनुभूती देऊन जाई

चौकटमुक्त रोमांच तरलस्थितीची 

रे मना, गरज तुला रे अशाच निश्चयी ठोशाची  

की पुनः हिंमत न व्हावी

कुणा प्रलोभनीय चौकटीची,  

तुला येऊन भिडण्याची 

गगनमार्गी चौकटमुक्त रोमांचित विहरणाऱ्या रे तुला 

पुन्हा चौकटींच्या मोहात ओढण्याची


Rate this content
Log in