बहार मोहोरांची 🌸
बहार मोहोरांची 🌸
1 min
12.1K
बहार ही सुमनांची,
पखरण सुगंधाची
ऋतूराज वसंताची,
पालवी नव्हाळीची... ||1||
ठरते संजीवनी ती,
क्रियाशील मनांची
नव्हाळवी कलांतून,
रसिकताच जनांची... ||2||
बहरत्या ऐशा मनांनी
मोदे तो ऋतुराजही ,
पहा मोदूनि पुनः फुलवी,
बहार तो मोहोरांची ||3||