STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

5.0  

Nalanda Wankhede

Inspirational

निखारे

निखारे

1 min
624




नजरेतील निखारे बघ जाळतात कसे

कळी समजून निर्दयतेने खुडतात मला

फाटका संसार


जन्म माझा माणसाचा बघ विटाळला

मंदिराच्या पायरीवरूनचं पिटाळले मला


फाटक्या संसारात पाय गुंडाळून अधू झाले

पुनर्जन्माच्या कर्माची मुक्ताफळे म्हणतात मला


गरिबी बघ गोचिडासारखी चिकटलेली

स्वप्नातही धावून धावून मारतात मला


जगण्यातील गोडी संपायला आली

सुखाचा मारा अजीर्ण होतोय मला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational