नेतृत्वगान
नेतृत्वगान


शिवनेरीत जन्मला शिवराय
वीर, तयाची जिजाऊ माय
दादोजींच्या हाती घडले
राष्ट्रप्रेमाचे धडे गिरवले
शिवमस्तकी सजले स्वप्न
स्वराज्य हेची तव ध्येय
झाला सन्मान महिलेचा
स्वराज्याच्या या भूमीत
जनसामान्यांचा माऊली
खडा उतरला रणांगणी
नेतृत्व पाहता तयाचे
हादरली गनिमाची मती
आदिलशाही मुघलशाही
सारे फासे विफल झाले
स्वराज्याच्या शिवराज्यात
समतेचे नारे वाहू लागले
आजही स्मरे हा इतिहास
जातीवादाच्या गोंधळात
किर्ती तुझिया नेतृत्वाची
आजही गाते माझी माय