नाटक
नाटक
हसायचे बघ आलो करून नाटक मी
रडायचे बघ आलो करून नाटक मी
मला तुला अजमावयाचे अता सजणी
रुसायचे बघ आलो करून नाटक मी
कळेल आज मला शत्रु कोण कोण सखा
लढायचे बघ आलो करून नाटक मी
कुणास आवडतो मी बघून मी हसलो
मरायचे बघ आलो करून नाटक मी
मुला असे शिकतांना निजायचे नसते
शिकायचे बघ आलो करून नाटक मी
उन्हात जीवन माझे जळून राख उडे
जगायचे बघ आलो करून नाटक मी
