STORYMIRROR

Madhuri Dashpute

Romance

4  

Madhuri Dashpute

Romance

नातं -तुझं माझं

नातं -तुझं माझं

1 min
296

तो म्हणाला तिला तूला आहे स्वातंत्र्य

मनमुराद जग तू नाहीयेस कुठलंच यंत्र


भिरभिर कर फुलपाखरासारखं की

आकाशात झेपाव स्वैर पक्षासारखं 


ऐकून तिला अति हर्ष झाला मनी

म्हणाली लाभावे पती तुम्हीच जन्मोजन्मी


घाबरले होते, बावरले होते नवीन या घरात

दचकले होते पाऊल टाकताच या दारात


पण तुम्ही आहात पाठीशी मग भीती कसली आहे

कळालंय तुम्हांला की मला ही एक मन आहे


संसाराच्या या प्रवासात हेच तर हवं असत

त्याशिवाय संसाराचं चाक नीट चालत नसतं


समजून घ्यावं एकमेकांना, प्रेम द्यावं अपार

तेच असत सुखी संसाराचं खरं सार


त्याच आणि तीच असच असावं नातं

अगदी नितळ निळ्या समुद्रासारखं वाहत....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance