नारीशक्ती
नारीशक्ती
आजच्या गर्भात दडे उद्याची शक्ती
खुडेल का फुलेल ना याची भीती.
तूच आहे स्वतः संघर्षाची गाथा
कळू दे जगाला तुझ्या साहसी कथा.
देऊन जन्म फुलवतेस नव जीवनाला
कोटी कोटी प्रणाम तुझ्या सहनशक्तीला.
ताराबाई ते हिमा दास चा खडतर प्रवास
नारीशक्ती चा दिसे न थांबणारा विकास.
कवटाळूनी पुरोगामी समाजाचे बळ
झुगारुनी भेदभाव रोखलास अन्यायी छळ.
शूरवीर ही तुझ्यापुढे झाले नतमस्तक
तुझीच वीरगाथा गौरवीतात असंख्य पुस्तक.
निरक्षरतेतुन साक्षरतेचा लावलास दिवा
उंबरठा ओलांडुनी स्वप्नांना दिली हवा.
बदलला काळ तरीही जोपासली संस्कृती
तिन्ही जगात झाली तुझी अजरामर कीर्ती.
स्वहित सोडून जोखून दिलेस लोक सेवेला
तरीही नाही विसरली तू तुझ्या कुटुंबाला.
स्व ते समाजकल्याणातून दिसे तुझी भक्ती
तूच आहेस या जगाची प्रबल नारीशक्ती.
