नामशेष
नामशेष
आज अचानक आला
पाण्याला या वेग
उधळीत आल्या लाटा
उध्वस्त झाले जग..॥धृ॥
वाहुन गेला सारा
उभारलेला संसार
खुणा राहील्या मागे
कधी होते घरदार..॥१॥
पाण्याचे रौद्ररुप
फार भीषण होते
दूख:च्या दरी कडे
हे सर्व नेत होते..॥२॥
पाण्याचे तांडव हे
शांत झाले जेव्हां
मनाचे थिजलेलेपण
विचार करे तेव्हां..॥३॥
