शब्द मोती.
शब्द मोती.
1 min
112
पाझरले शब्द हे जलधारा समान,शब्द शब्द भिजले शाईच्या दवान..॥धृ॥
खळ खळता झरा वाहे,कवितेच्या रुपान,नाही कुठली मर्यादा,आड नाही कुठुन..॥१॥
कागदावर भाव उमटे,मनाच्या कुपितून,सुंदर शब्दांचे हे रंग दिसे कृतीतून..॥२॥
रचनांच्या या पंक्ती,बसल्या बाई नटुन,उपमा व अलंकारांनी दिल्या बाई सजवून..॥३॥
