दिपावली
दिपावली
1 min
389
दिप प्रगटले मांगल्याचे,घरोघरी दिपोत्सव,
रात्रनभी ऊजळली,साजरा करु उत्सव....
दिवाळीचा रोज दिवस हा,नाविन्याने नटलेला,
रांगोळ्या अन तोरणाने घरिदारी सजलेला....
फराळाची लयलुट,नविन कपड्यांची सळसळ,
पूजन चाले घरोघरी,अत्तराचा दरवळ.....
प्रेमाचे हे आदान प्रदान,आनंदी वातावरणी,
सर्वांना सुखी ठेव,हे देवाजवळ मागे गृहिणी....
