STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

नाळ जोडली मातीशी

नाळ जोडली मातीशी

1 min
430

काळ्या मातीत शिवारी

शेतकरी तो राबतो

बैलासंगे काम करी

धान्य छान पिकवतो.


नाळ तयाची सदैव

जोडलेली त्या मातीत

दिन रात तो कष्टतो

तरी राजा आनंदीत.


नव्या युगाच्या जोमाने

धाव घेतली शहरी

पोरा बाळा सांगण्याने

जीव झाला तो लहरी.


चैन नसे शहरात

घोर लागला जिवाला

ओढ काळ्या त्या मातीची

शांती मिळेना मनाला.


बंध त्याचे शिवारात

नाळ जोडली मातीत

सुख लागे राबण्यात

काळ्या ओल्या त्या शेतीत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational