STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Action

2  

Prem Gaikwad

Abstract Action

नाही कोणी वाली..

नाही कोणी वाली..

1 min
69

कोरोनाने आईबाप 

देवा घरी गेले,

अनाथ झालो दोघं

आम्ही चिमुकले.


दुनियेत नाही या

आम्हा कोणी वाली,

मिळेल कुठे आम्हा ?

मायेची सावली .


करु कसं माझ्या 

बहिणीचा सांभाळ,

कोसळलं संकट

कसं फाटलं आभाळ.


जगावं सांगा कसं 

प्रश्न आहे मोठा,

भाकरीचा प्रश्न आहे

द्या दोन घास पोटा.


डोळ्यात येती अश्रू

आई बाबाची आठवण,

या साऱ्या दुनियेत

सांगा आम्हा वाली कोण?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract