Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gautam Jagtap

Tragedy

5.0  

Gautam Jagtap

Tragedy

मुलींनो तुमचं काळीज

मुलींनो तुमचं काळीज

1 min
193


मुलींनी कसं जगायचं या क्षणी|

अत्याचाराची बातमी येते कानी||

मुलींनी कसं वागावं कसं जगावं|

याचे कुणालाच काही वाटत नाही||

माझं मन गहिवरून येत...

मुलींनो तुमचं काळीज काय म्हणत?(१)


मुली ह्या आपल्या देशाचं भाग्य आहेत|

जन कल्याणाच त्या प्रतिक आहेत||

निच वृत्तीचे हिंसक त्यांची आब्रु लुटतात|

भर दिवसा रस्त्यावरती त्यांना का छेडतात||

माझं मन गहिवरून येत...

मुलींनो तुमचं काळीज काय म्हणत?(२)


जाता येता त्रास मुली गुपचूप सहन करतात|

आई वडिलांच्या आब्रू साठी का शांत बसतात||

जगायचं आहे तुम्हाला घ्या,दुर्गा कालीच अवतार|

जागवा तुमच्यात आदिशक्ती करा हिंसक समाजकंटकांना ठार||

माझं सळसळत रक्त सांगत...

मुलींनो तुमचं काळीज काय म्हणत?(३)


मुलींनो एक व्हा करा स्वताचे संरक्षण|

मनगटात जोर लावून गा धाडसाचे गाण||

निडरा सारखं हिंमतीने वागावं पुन्हा तुमच्या वाटेला निच हिंसक नाही यावा|

मुलींनो तुम्ही मनमोकळे जगा निचवृत्तीच्या घान विकृतीना चांगलाच धडा शिकवा||

माझं सळसळत रक्त सांगत...

मुलींनो तुमचं काळीज काय म्हणत?(४)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy