मतदानाचा हक्क गाजवू..
मतदानाचा हक्क गाजवू..
अठरा वर्ष पूर्ण झाले
मग सुज्ञ झालो समजा
नव युवकांनो चला
मतदानाचा हक्क गाजवा.....
देश आपल्या सगळ्यांचा आहे
विचार पूर्वक मतदान करा
जे जनतेच्या भाजूने लढतील
त्याच नेत्याची कास धरा......
छोट्या छोट्या आमिषांना
पडू नका लोकहो बळी
मग सत्येवर आहे तो वर
तेच नेते जनतेशी करतात खेळी.....
ताई, माई , अक्का
विचार करा पक्का
जनतेचे हित करणाऱ्या
चिन्हावरच मारुया शिक्का.......
मतदान करताना कोणच
करू नका अजिबात घाई
योग्य मतदान करूनच
गर्वाने बोटाला लावू शाई......
युवा-युवती, थोर-मोठे
सर्वच करू मतदान
मतदान आहे पवित्र दान
हक्क गाजवून ठेवूया मान........
शिकून सवरून मित्रहो
अज्ञानी नका बनू
योग्य निर्णय घेऊन
दारिद्र्य,भ्रष्टाचार दूर करू......
