STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

4  

Sangita Pawar

Inspirational

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस

1 min
248

कुसुमाग्रजांचा जन्मदिन

असे मराठी भाषा दिन

 लाभले आम्हास भाग्य

 असे आम्हा अभिमान ||


लहानग्या मुला-बाळात

बोबडी भाषा रांगते

माय हाक देई गोड

चराचरात मराठी डोलते ||


सर्वगुणसंपन्न अशी

अलंकारांनी नटलेली

देखणी माझी मराठी

मराठा हृदयी वसलेली ||


पाया शिक्षणाचा भारी

होईल भक्कम इमारत

महान अधिकारी होतील

घेऊनी शिक्षण मराठीत ||


कवी, लेखक, थोर संत

असे साहित्याचे वारकरी

साहित्यातून ओळख खरी

मराठी भाषाच लई भारी ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational