STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

मोठी गोष्ट.. !

मोठी गोष्ट.. !

1 min
150

गोष्ट थोडीच मोठी आहे 

मनी भावनांची कोंडी साहे 

अव्यक्त झाल्या काही मुक्या 

अबोल मनीची ती हाक आहे 


गोष्ट थोडीच मोठी आहे 

शब्दांत न मांडता व्यथा 

साद घातली नभासही या 

ती अभेद श्रद्धेची भिंत आहे 


गोष्ट थोडीच मोठी आहे 

अपुऱ्या स्वप्नास आशेची पालवी 

आसवांच्या गर्तेत सुखाच्या कथा 

ओल्या पापणीत उद्याची आस आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy