मोह
मोह
नको मोह पुन्हा, पुन्हा पाहण्याचा,
डोळ्यात दाटलेले ते भाव वाचण्याचा,
नको ते बहाणे, नको तो उसासा,
पुन्हा मोह होणे अन तुझा तो दिलासा,
नको मोह पुन्हा
नको त्या आणा नको त्याच शपथा,
कश्याला उगी जुनी तीच गाथा ?,
जरा संभाळ तू , मी ही जरासा,
वळून पाहू मागे आहे एक आरसा,
नको मोह पुन्हा
नको तो अबोला नको तो दुरावा,
या भाबड्या मनाला देऊ जरा विसावा,
तू घे जरा विश्रांती मीही घेतो जराशी,
आठवणींचा पिसारा घेऊनिया उशाशी,
नको मोह पुन्हा
नकोच भेटणे ते नकोच तो दुरावा,
स्मृती अम्युल त्यांचा हृदयात आहे ठेवा,
नकोच मोह पुन्हा, पुन्हा पाहण्याचा,
डोळ्यात दाटलेले ते भाव वाचण्याचा