मोगरा
मोगरा
वसंत परिमळ येता
शुभ्र कळ्या लेऊनी
मोगरा अंगणी बहरला
फुलता फुलता अलगद
उमलून फुले झाली
मोहक मोगरा शुभ्र फुले
पानोपानी खुलून दिसे साजरा
गंध जसा कुपीतील अत्तराचा
शिंपीत कळी कळीने शृंगार केला
भवरेसुद्धा गुणगुणले पाहूनी हा सोहळा
पाहूनही न पाहतो तुला
कैसे आम्ही अंध
तुझ्या सद्गुणांचा तुला
थोडा ही नाही रे घमंड
कुठलाही भेदभाव न करता
देतो सर्वांना सारखा सुगंध
निसर्गात समरस होऊनी घेतो
जीवनाचा मनमुराद आनंद
नाही पारावार रूप, सुवासाला तुझ्या
प्रत्येकाच्या मनास भुरळ
पाडतो तुझा गंध
स्वतःचा व सद्गुणांचा बडेजावपणा न करता जगावे तुझ्यापरी होऊनी स्वच्छंद...
