मनीचा विकास
मनीचा विकास
मनीच्या नादानं विकास वेडा झाला
या मनीच्या या नादानं विकास वेडा झाला
राजकारणी मोठ्या-मोठ्या बाता मारतो
चोराला सोडुन जनतेला धरतो
धोरणात यांच्या सामान्य भरडतो
सतत खिसा यांचा रिकामा दिसतो
पैसे भरण्यास माणसांच्या लांब-लांब लाईन
रोगग्रस्ताला सोडुन दुसर्याला सलाईन
प्रेमपञावर असे मनी-विकास यांची साईन
दोघं ही घेतात थोडी-थोडी वाईन
विकास मनीची जोडी जणु राघु अन् मैना
जोडीनं मिळुन करतात सार्यांची दैना
पक्षाचा असे वेगवेगळा बाणा
राजकारणी छापे लाखोलाख नोटा
उंदीर-मांजराच्या भांडणात माकड लोणी खाई
घबाड सापडते मात्र राजकारण्याला बाई
जात-धर्मात विकास हा आडला
मनीच्या घोटाळ्याने विकास बदनाम झाला
