STORYMIRROR

Satish Nahire

Inspirational

4  

Satish Nahire

Inspirational

मन्ही माय

मन्ही माय

1 min
388

(*अहिराणी भाषेतील कविता*)


  *कवितेचे नाव- मन्ही माय*


 *मन्ही माय मनासाठी काय नही करे* 

 *आभाळ ठेंगण व्हय जदळ ती मना लाड करे* 


 *व्हतु धाकला तर माय जग माले वाटे* 

*त्या जग मधल्या समद्या गोष्टी सोप्या सोप्या वाटे* 


 *मन्ही माय मनासाठी रात्र ना दिवस करे*

*कितली भी थकेल असो तरी मन्हा साठी जागे* 


*खोड्या जरी कऱ्यात मी तरी तिन्हा आधार वाटे* 

*चुकेल शे मन्ह ह्याई ती माले समजाडी सांगे* 


*मन्ही माय माले काळ्या माटी गत भासे* 

*उन्ह, वारा, पाऊस झेलीसन मन्ह पोटभरे*

 

*शिकी सवरी शी मी एक चांगला माणूस व्हवो* 

*तीना संस्कारना शिदोरी मना पाय जमिनवर ठेवो* 


*आज भी मन्ही माय दुजा भाव करत नही*

*मायेनां ताब्या तीना अजून सरत नही* 


              *सतिश नहीरे*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational