STORYMIRROR

Satish Nahire

Abstract

3  

Satish Nahire

Abstract

जीवन - आरसा

जीवन - आरसा

1 min
136

आरसा हा आरसा, प्रतिबिंबाशी हा एकरूप

आरसा हा जीवनाचा, जीवनाशी समरूप

हेच सार आरश्याचे, आरसा ना बेईमान

जीवनाचे रंग वेगळे, वेगळे त्याचे प्रतिमान


बाह्य रंगाचे गाई गोडवे, आंतरिक हे पार काळे..

सुकला ओलावा स्नेहाचा.... दांभिकतेचे डोहाळे

वैभवाचे दर्शन येथे,रेलचेल पाल्हाळे

चित्ती नसे शांतता,परी सुखाचे सोहळे


नात्या नात्यातील गुफंण ,... अवघडलेले सारे...

कच्च्या धाग्याने तुटतात ,.. विश्वासाचे धागे

 नाही नवलाई येथे, बंद मोकळीचे पहारे

 श्वास घुसमटतो तरी, वाहे मंद हास्याचे हे वारे


 क्षण सुखाचे विखुरतात,आशा उद्याची मावळते

 जगण्याची घोडदौड.,. कुण्या जाण्यानं न थांबते

 बेसूर हे जीवन गीत, परी जगण्यास सांगते

 रडवलेल्या चेहऱ्याने, पुन्हा पुन्हा हसवते

      रडवलेल्या चेहऱ्याने, पुन्हा पुन्हा हसवते


     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract