STORYMIRROR

Satish Nahire

Others

3  

Satish Nahire

Others

फिरुनी हात धरावा जीवनाचा...

फिरुनी हात धरावा जीवनाचा...

1 min
160

भीत भीत,,जगत होतो

जगतांना कित्येकदा मरत होतो

त्या मरणांत हीआनंद नव्हता

अन् जगणांत ही अर्थ नव्हता

भ्यालो कधी दुष्मनांना

भ्यालो कधी स्वजनांना

भ्यालो प्रस्थापितांच्या साम्रजांना

अन् भ्यालो समाजकटकांच्या उच्छादांना

या भ्याडाची वीट येता

सनक येती मस्तकाशी

मग सत्याची कास धरुनी

अन् मरावे ध्येयाच्या शेवटाशी

संपवावा भ्याडपणा अन् ही लाचारी

संपवावी मक्कतेदारी षंढांची

बोट धरुनी निर्भयतेचा अन् धाडसाचा

 फिरुनी हात धरावा जीवनाचा

    फिरुनी हात धरावा जीवनाचा 


Rate this content
Log in